Connect with us

मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mazya Baykocha Priyakar Marathi Movie

News

मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ चे दिग्दर्शन केले आहे राजीव एस. रूईया. चित्रपटांच्या नावातच कथा लपलेली आहे. कॉमेडी शैलीची झलक व कौटुंबिक पृष्ठीभूमीवर कथा आधारित असून प्रेक्षकांना ह्या सिनेमात मनोरंजनाचा मसाला पहावयास मिळणार आहे.

चित्रपटांतील कलाकार आहेत अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, प्रिया गमरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोघे, पदम सिंग, स्वाती व इतर. निर्माता आहेत प्रदिप के. शर्मा व दिपक रुईया.

चित्रपटांत एकूण चार गाणी आहेत. एवढचं काय तर मीरा जोशी वर धमाकेदार आयटम सांग चित्रित केले आहे. चित्रपटांचे चित्रिकरण भोर व मुंबई मध्ये फिल्मसिटी येथे करण्यात आले आहे. चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण होताच निर्मात्यांचा सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top