राव दिवसेगणिक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याअगोदर उत्कंठा वाढवण्यात यशस्वी होतायत. म्हणजे बघा ना, सिनेमा बॉक्स ऑफिसवर येण्याअगोदर त्याचे फर्स्ट लुक्स, मोशन पोस्टर्स, टीझर्स आणि ट्रेलर्स सिनेमाचा सस्पेन्स अश्या काही नेक्स्ट लेव्हलवर नेऊन ठेवतात कि प्रेक्षक हमखास तो सिनेमा बघायला यायलाच हवा.
सध्याचं म्हणाल तर सतीश फुगे दिग्दर्शित ‘बॅक टू स्कूल’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ सुरुये. सतीश फुगे हे त्यांचा आगामी प्रोजेक्ट असलेल्या ‘बॅक टू स्कुल’ सिनेमाद्वारे दिगदर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. सिनेमाचा बझ कायम ठेवण्यासाठी म्हणा किंवा, प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याच्या अनुषंगाने म्हणा निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचे नवीन पोस्टर अनावरण केले आहे.
बॉस, ‘बॅक टू स्कुल’ चा पोस्टर एकदम कुल आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे शीर्षक ‘बॅक टू स्कूल’ सादर करणारी स्लेट दिसते आणि ‘बॅक टू स्कूल’ 22 जून 2023 रोजी पडद्यावर येण्यासाठी सज्ज असल्याचे देखील पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. स्टारकास्टबद्दल सांगायचं झालं तर सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, अधीश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पाटणे, रुपाली पठारे, किरण झांबरे, डॉ. पारिवार, डॉ. कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे आदींचा सिनेमात समावेश आहे.
यावेळी दिग्दर्शक सतीश फुगे सांगतात “शाळा हे आमचे दुसरे घर आहे. शाळा स्वतःच अद्वितीय आहे. शाळेत अनेक आठवणी जपल्या जातात आणि त्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतात. या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट सर्व वयोगटांनी आवर्जून पाहावा.”
आमची मराठी कलाकारची टीम तर रेडी आहे, मंडळी तुम्हीसुद्धा तयार आहात ना शाळेच्या वाईब्स परत अनुभवण्यासाठी? मग नक्की बघा ‘बॅक टू स्कूल’ २२ जुन २०२३ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित!