11 महिने ago
226 views

Deepika Padukone Pregnant : कुणीतरी येणार गं! दीपिका आणि रणवीर होणार आई-बाबा

Deepika Padukone And Ranveer Singh: दीपिकानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
by
11 महिने ago

Deepika Padukone : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच गूड न्युज देणार आहेत, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चेत असलेल्या बातमीला आता पूर्णविराम मिळाला आहे, या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार असल्याची माहिती जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांसोबत शेअर केली आहे.

 प्रेग्नेंसी कन्फर्मेशन पोस्ट

दीपिकाने प्रेग्नेंसी कन्फर्मेशन पोस्टमध्ये लहान मुलांचे टोपरे, झबले, शूज असे विविध इमोजी वापरुन त्यात सप्टेंबर २०२४ असे म्हटले आहे. तसेच त्या खाली दीपिका आणि रणवीर असे देखील लिहिले आहे. यामवरुन चिमुकल्याचे आगमन सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे नक्की झाले आहे. 

सेलिब्रिटींनी केलं अभिनंदन

प्रेग्नेन्सी कन्फर्मेशन पोस्टच्या कॅप्शनमध्ये दीपिकाने जोडलेले हात आणि दुष्ट नजर रक्षा इमोजी टाकला आहे. या पोस्टवर मनीष मल्होत्रा, बिपाशा बासु, मेधा शंकर, अंगद बेदी, मियांग चांग, मसाबा गुप्ता यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनीही दीपिकाचं मदर्स क्लबमध्ये येत असल्याचं स्वागत केलं आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Your email address will not be published.