8 महिने ago
162 views

भारतात हिरो झूम १६० लाँच डेट आणि किंमत: डिझाइन, इंजिन, फीचर्स

Hero Xoom 160 Maxi-scooter unveiled in India
by
8 महिने ago

हिरो झूम १६० स्कूटरची भारतात लाँच डेट आणि किंमत:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील बहुतांश लोकांना हिरो कंपनीच्या बाईक आणि स्कूटर आवडतात. हिरो लवकरच हिरो झूम १६० स्कूटर भारतात लाँच करणार आहे.

हिरोने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४ मध्ये हिरो झूम १६० स्कूटरचे प्रदर्शन केले असून ही हिरोची ऑफ-रोड स्कूटर असणार आहे. चला जाणून घेऊया हिरो झूम १६० लाँच डेट आणि हिरो झूम १६० ची भारतात किंमत.

हिरो झूम १६० भारतात अपेक्षित लाँच डेट

हिरो झूम १६० ही एक ऑफ-रोड स्कूटर आहे जी १५६ सीसीचे शक्तिशाली इंजिनसह येते. हीरोने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो इव्हेंट 2024 मध्ये ही स्कूटर सादर केली आहे. हिरो झूम १६० च्या भारतात लाँचिंग डेटबद्दल बोलायचे झाले तर हिरोकडून या स्कूटरच्या भारतात लाँचिंग डेटबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही स्कूटर मार्च २०२४ पर्यंत भारतात लाँच केली जाऊ शकते.

हिरो झूम १६० ची भारतात अपेक्षित किंमत

हिरो झूम १६० स्कूटर एक अ‍ॅडव्हेंचर स्कूटर असणार आहे, या स्कूटरमध्ये आपल्याला अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. हिरो झूम १६० च्या भारतातील किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हिरोकडून अद्याप या स्कूटरच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, या हिरो स्कूटरची एक्स-शोरूम किंमत भारतात १.१० लाख ते १.२० लाख रुपयांदरम्यान असू शकते.

हीरो झूम १६० स्पेसिफिकेशन्स

Scooter NameHero Xoom 160 (हिरो झूम १६०)
Hero Xoom 160 Launch Date In IndiaMarch 2024 (Expected)
Hero Xoom 160 Price In India1.10 Lakh Rupees To 1.२० Lakh Rupees (Estimated)
Engine 156cc
TransmissionCVT Automatic
MileageMore Than 40 kmpl
Features Digital Instrument Cluster, LED Headlamp, Bluetooth Connectivity, Smart  Key, USB Charging Port
Hero Xoom 160 Specification

हीरो झूम १६० डिझाइन

हिरो झूम १६० डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरमध्ये आपल्याला अतिशय स्टायलिश आणि आकर्षक डिझाइन पाहायला मिळते. हिरोने ही स्कूटर ऑफ रोडिंगसाठी डिझाइन केली असून ही एक अ‍ॅडव्हेंचर स्कूटर आहे.

हीरो झूम १६० डिझाइन

ही स्कूटर खूपच आकर्षक आणि फ्यूचरिस्टिक आहे, या स्कूटरसमोर आपल्याला स्टायलिश स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि वाढलेली विंडस्क्रीन पाहायला मिळते.

या स्कूटरमध्ये आपल्याला १७० एमएमची ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळते. या स्कूटरच्या मागील बाजूस एलईडी दिवे देखील पाहायला मिळतात आणि चाकांबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरवर आपल्याला १४ इंचाची चाके पाहायला मिळतात.

हीरो झूम १६० इंजिन

हिरो झूम १६० स्कूटर दिसायला खूपच आकर्षक आहे, त्यासोबतच या स्कूटरवर आपल्याला अतिशय दमदार इंजिन देखील पाहायला मिळते. हिरो झूम 160 इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरमध्ये १५६ सीसी लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन पाहायला मिळते, जे १४ बीएचपी पॉवर आणि १३.७ एन एम टॉर्क जनरेट करते.

हिरो झूम १६० फीचर्स

हिरो झूम १६० स्कूटरमध्ये आपल्याला हिरोचे अनेक अत्याधुनिक फीचर्स पाहायला मिळतात. हिरो झूम १६० फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरवर आपल्याला डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एलईडी लाइट्स, स्मार्ट की, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिमोट की इग्निशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, हिरोकडून ड्युअल डिस्क ब्रेक सारखे फीचर्स पाहायला मिळतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Your email address will not be published.