2 महिने ago
47 views

Murder Mubarak movie Trailer: मर्डर मुबारक चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, विजय वर्मा, सारा, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी मोठ्या कलाकारांची फौज

Murder Mubarak Trailer Out: तगडी स्टार कास्ट असणाऱ्या 'मर्डर मुबारक' या चित्रपटाच्या ट्रे्लरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील डायलॉग्स आणि सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
by
2 महिने ago

‘मर्डर मुबारक’ (Murder Mubarak movie Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) ते सारा अली खान (Sara Ali Khan) आणि संजय कपूर (Sanjay Kapoor), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), विजय वर्मा (Vijay Varma) अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ही एक हत्या, 7 संशयित आरोपी आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याभोवती आहे. लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

“जो कत्ल करते हैं वो दिखते कैसे हैं, साउथ दिल्ली की शहजादी की तरह या चांदनी चौक के तबाह आशिक की तरह।” हा पंकज त्रिपाठी यांचा डायलॉग टीझरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर टीझरमध्ये विविध कलाकारांची झलक दिसते. मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणार आहे.
“कई हत्यारे हत्यारों की तरह दिखते ही नहीं हैं। वे एक आम औरत या आदमी की शक्ल में होते हैं। मन ही मन मुस्कुरा रहे होते हैं और खुद को बधाइयां दे रहे होते हैं।” या पंकज त्रिपाठी यांच्या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मर्डर मुबारक या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला कॅप्शन देण्यात आलं, “खतनाक रहस्य, अनपेक्षित ट्विस्ट आणि रॉयल दिल्ली क्लबचे क्रेझी रिच सदस्य; मर्डर मुबारक म्हणायची वेळ आली आहे! मर्डर मुबारक, 15 मार्चला येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर!”

कधी रिलीज होणार चित्रपट?

मर्डर मुबारक हा चित्रपट 15 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनुजा चौहानच्या ‘क्लब यू टू डेथ’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात करिश्मा कपूर ,सारा अली खान,संजय कपूर, विजय वर्मा, टिस्का चोपडा, डिंपल कपाडिया आणि सुहेल नैय्यर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Your email address will not be published.