मराठी सिनेमा एक अजरामर सिनेसृष्टी! आणि त्यातही तुम्ही जर 90s कीड असाल तर आठवतो का तो मराठी सिनेमाचा सोनेरी काळ? रविवारची छानशी संध्याकाळ आणि सह्याद्री वाहिनीवर लागलेला मराठी सिनेमा. कित्येकही रिपीट टेलिकास्ट झाले तरी दरवेळी आपण सेम एनर्जीने संपूर्ण सिनेमा बघायचो. वो भी क्या दिन थे भाईलोग… आज तोच फिल परत तुम्हाला देण्यासाठी आमच्या मराठी कलाकारच्या टिमने बरीच मेहनत केलीये आणि, घेऊन आलो आहोत एक सदाबहार लिस्ट “10 गाजलेले मराठी सिनेमे, जे किती ही वेळा पाहिले तरी तुम्ही कधीच कंटाळाणार नाही“
१. अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banwa Banwi)
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुशांत रे, निवेदिता जोशी, प्रिया अरुण, अश्निनी भावे, सुधीर जोशी, नयन तारा,विजू खोटे स्टारर मराठी चित्रपट सृष्टीमधील अजरामर चित्रपटांपैकी लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवा बनवी’. सचिन पिळगावकर दिग्दर्शित धमाल विनोद, कमाल डायलॉग, भरपूर ड्रामा आणि थोडी अॅक्शन असा परिपूर्ण चित्रपट आजही प्रेक्षकांना प्रंचड आवडतो. ‘धनंजय माने इथेच राहतात का????’, ‘तुम्ही दिलेले 70 रुपये पण वारले..,’ ‘हा शुद्ध हलकटपणा आहे माने…’ हे सिनेमातील डायलॉग आजही सोशल मिडियावर मीम्स म्हणून व्हायरल होतात. डोक्यावर छप्पर मिळविण्यासाठी सिनेमातील कलाकार कशी बनवाबनवी करतात हे ह्या थीमवर संपूर्ण स्टोरी आहे.
हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
२. सैराट (Sairat)
सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. या चित्रपटाच्या कमाईने मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये इतिहास घडवला आणि रेकॉर्ड ब्रेअक कमाई केली जी मराठी चित्रपटांमध्ये कधीही झालेली नव्हती.
सैराट चित्रपट तुम्ही zee5 पाहू शकता.
3. मुंबई- पुणे- मुंबई (Mumbai Pune Mumbai)
‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट बरोब्बर बारा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सिनेमा बराच लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-2’ ६ वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवडे यांचे असून अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने काम केले आहे. पुण्यात भेटलेल्या अनोळखी तरुणासोबत आपलेपणाचे नातं कसं तयार होतं हे अतिशय रंजक पध्दतीने मांडले आहे. मुळचा मुंबईचा असून स्वप्निल जोशीने अस्सल पुणेकरांची भूमिका आणि पक्की पुणेकर असूनही टिपीकल मुंबईकर मुलीची मुक्ता बर्वेने साकारलेली भूमिका ही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमची छाप सोडून जाते.
मुंबई- पुणे- मुंबई चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
४. दुनियादारी (Duniyadari)
दिग्दर्शक व निर्माता संजय जाधवचा ‘दुनियादारी’ चित्रपट 19 जुलै, 2013 ला प्रदर्शित झाला. या चित्रपटातील शिरीन, श्रेयस (बच्चू) , दिगंबर (दिग्या), मिनाक्षी (मीनू), साईनाथ (साई) या मित्रांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ‘दुनियादारी’ सिनेमाने मराठी चित्रपटांची परिभाषा बदलली. संजय जाधव यांची ही एक उत्कृष्ट कलाकृती होती. मैत्री आणि प्रेमाची ही कहाणी सांगणारी कथा मराठी सिनेमा मध्ये सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. सिनेमा मल्टिस्टारर असून स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. चित्रपटाचा शेवट भुतकाळातील आठवणींमधून बाहेर येऊ पुन्हा त्याच कट्ट्यापर्यंत येऊन पोहचतो. चित्रपटातील सर्व गाणी खूप सुंदर आहे की, आजही ही गाणी तरुणाईच्या मनावर राज्य करत आहे.
हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
५.मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern)
२०१८ साली प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुफान गाजला. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची विदारक कहाणी मांडण्यात आली होती. चित्रपटाची कथा, संवाद, गाणी, कलाकारांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना आवडलं. ज्या शेतकर्यांनी आपली जमीन बांधकाम व्यावसायिकांना विकली आणि त्यांना बचतीची माहिती नसल्यामुळे लवकरच दारिद्र्यात ढकलले गेले अशा शेतकऱ्यांसमोर भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. गुन्हेगारी विश्वात सक्रिय असलेल्या कुटुंबातील तरुण पिढीविषयीही यात भाष्य केले गेले आहे.
हा चित्रपट तुम्ही zee5 पाहू शकता.
६. झपाटलेला (Zapatlela)
‘तात्या विंचू’, नुसत्या नावानेच भल्याभल्यांच्या छातीत धडकी भरविणारा, लहानांपासून-मोठय़ांपर्यंत सर्वांचा थरकाप उडविणारा असा हा दृष्ट खलनायक. या तात्या विंचूने नव्वदच्या दशकात मराठी रूपेरी पडद्यावर आणि प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ‘झपाटलेला’ या महेश कोठारे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून साकारलेल्या चित्रपटातला तात्या विंचू हा बाहुला आजही मराठी प्रेक्षकांमध्ये तेवढाच लोकप्रिय आहे. झपाटलेला चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक हे तुम्हाला माहित आहे का? झपाटलेला हा चित्रपट ‘चाइल्डस प्ले’ (Childs Play) या चित्रपटाची कॉपी आहे हा चित्रपट 1988 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लक्ष्या (लक्ष्मीकांत बोलके), महेश कोठारे यांनी इन्स्पेक्टर महेश जाधव तर जयराम कुळकर्णी – कमिश्नर, दिलीप प्रभावळकर – तात्या विंचू या मुख्या भूमिका या दिग्गज कलाकारांनी साकारल्या आहेत. भयपट विनोदी म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो.
झपाटलेला चित्रपट तुम्ही zee5 पाहू शकता.
७. टाईमपास (Timepass)
आई बाबा आणि साईबाबा शप्पथ… हा डायलॉग म्हटलं कि लगेच टाईमपास सिनेमाची आठवण येते. ‘हम जियेंगे भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से..’ असं म्हणत सुरु झालेली दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी तुम्हाला आठवत असेलच. अगदी थोडक्यात सांगायचं तर, सिनेमाचा प्रभाव चांगला आहे. पण, पहिल्या दोन भागात समोर हा थोडा फिका पडतो असं वाटतं. अगदी शेवटी सिनेमात एक वेगळा ट्विस्ट आहे आणि त्यामुळे उत्सुकता नक्कीच ताणली जाते आणि सिनेमा जाता जाता काहीतरी देऊन जातो. कलाकारांच्या कामामुळे आणि कथेतल्या हलक्या-फुलक्या विनोदामुळे आपला टाईमपास नक्कीच करतो. एक मनोरंजक राईड म्हणून सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही.
टाईमपास चित्रपट तुम्ही zee5 पाहू शकता.
८. जत्रा (Jatra)
अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि विजय कदम (Vijay Kadam) यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जत्रा’ (Jatra) या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. आता या चित्रपटाला जवळपास 16 वर्षे झाली आहे. मात्र, आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून बघतात. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गं ये ये मैना’ तुफान गाजली होती. चित्रपटाची कथा सुरू होते दोन गावांच्या जत्रेपासून,ज्यांच्यामध्ये कट्टर वैर आहे. जत्रेच्या यजनमान पदावरून चालत आलेला पारंपारिक वादामध्ये शहरातून आलेले भरत आणि सिद्धार्थ जाधव कसे अडकतात. सर्व कथा विनोदी शैलीमध्ये मांडली असून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.
हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
९. पछाडलेला (Pachadlela)
लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला पछाडलेला चित्रपट आठवतो का? कलाकारांच्या अभिनयाने संपन्न असलेला हा चित्रपट मराठी कलाविश्वात चांगलाच गाजला होता. या चित्रपटात झळकलेला प्रत्येक कलाकार मराठी कलाविश्वात आपलं भक्कम स्थान निर्माण करुन आहे. या चित्रपटामध्ये हॉरर स्टोरी दाखवण्यासोबतच रवी आणि मनिषा यांची सुंदर लव्हस्टोरीही दाखवली होती. हा चित्रपटाचे कथानक एका बँकेत काम करणाऱ्या तीन मित्रांभोवती फिरतो ज्यांची एका गावात पोस्टिंग होते. त्या गावातील वाड्यात (महालात) त्यांना राहण्याची सोय केलेली असते पण, वाडा भुताने पछाडलेला असतो. वाड्याचा पूर्वीचा मालकाचे(इनामदार) , त्याचा मुलगा (बाब्या) आणि त्याच्या विश्वासू सहाय्यकाचे (किरकरे)आत्मा अजूनही त्या घरावर राज्य करत असतात. तर गावातील एका पडक्या विहिरीवर दुर्गा मावशीचे भूत असते. या तीन मित्रांच्या अंगात हे भूत शिरते आणि विचित्र घटना घडू लागतात. या भुतांच्या तावडीतून हे तिघं स्वत:ला कसे सोडविणार या भोवती हे कथानक फिरते.
१०. आयत्या घरात घरोबा (Aayatya Gharat Gharoba)
आयत्या घरात घरोबा चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे ,अशोक सराफ, राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाची कथा अगदी नवाप्रमाणेच आहे. दरवर्षी वर्षी केदार किर्तीकर (सचिन) घरात येऊन रहाणाऱ्या गोपुकाकाापासून (अशोक सराफ ) कथेची सुरूवात होते. दुसऱ्याच्या घरात मालक असल्याप्रमाणे राहणाऱ्या गोपूकांकाचं हे गुपित केदारला समजते. त्यांना धडा शिकविण्यासाठी केदार स्वत:च्या घरात नोकर म्हणून जातो. त्यानंतर खरं-खोटं, लपवा-लपवीमध्ये विनोदी शैलीतील चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना भावूक करून जातो. लक्ष्या- अशोक सराफ- सचिन या धमाल जोडीच्या विनोदी चित्रपटाला आजही प्रेक्षकांच्या तितकीच पसंती मिळते आहे.