द क्रू सिनेमाची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. क्रिती सेनन, करीना कपूर आणि तब्बू या तीन अभिनेत्रीची प्रमुख भूमिका आहे. काही दिवसापूर्वीच या सिनेमाचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओ मध्ये करीना, तब्बू , क्रिती पाठमोऱ्या एअरपोर्ट वर चालताना दिसल्या. आता नुकताच या सिनेमातला या तिघींचा पहिला लुक समोर आलाय.
‘द क्रू’ मधील अभिनेत्रींचा लूक
‘द क्रू’ या चित्रपटातील तीन अभिनेत्रींचा लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती या रेड कलरच्या आऊटमध्ये दिसत आहेत. क्रिती सेनन तिच्या ,तब्बूच्या आणि करीनाच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. क्रिती ने या फोटोला कॅप्शन दिलं, “चेक-इनसाठी तयार आहात? क्रूसोबत उड्डाण करण्याची वेळ झाली आहे.”
कधी रिलीज होणार ‘द क्रू’?
राजेश ए कृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द क्रू’ हा चित्रपट 29 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि लोकप्रिय चित्रपट निर्माती एकता कपूर बनवत आहेत.
करीना कपूर, तब्बू, आणि क्रितीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात तीन अभिनेत्रांशिवाय कपिल शर्मा आणि दलजित दोसांझ हि महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत .