2 महिने ago
53 views

Yodha Teaser: हायजॅकर्ससोबत लढणार सिद्धार्थ मल्होत्रा; योद्धा चा दमदार टिझर झाला रिलीज

by
2 महिने ago

Yodha Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) आगामी ‘योद्धा’ (Yodha) या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत . या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच चाहते हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर दुबई मध्ये १३ हजार फूट उंचीवरून लाँच केले होते. आणि आता चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे . सिद्धार्थ ने त्याच्या चित्रपटाचा टीझर त्याच्या अकाउंट वर शेअर करून कॅप्शन मध्ये लिहिले आहे –

We’ve taken off! Gear up for the high-octane action on its way. #YodhaTeaser out now. ✈️
#Yodha in cinemas March 15.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ जबरदस्त ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. तो फायटिंग करताना दिसत आहे. ‘योद्धा’ या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात विमानाच्या हायजॅकने होते. जिथे सिद्धार्थ मल्होत्रा ​​कमांडोच्या रूपात धडाकेबाज स्टाईलमध्ये एन्ट्री करतो. एकीकडे ‘योद्धा’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​दहशतवाद्यांसोबत लढताना करताना दिसत आहे. तर दिशा पटानी एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

‘योद्धा’ हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहेत. या चित्रपटात दिशा पटानी पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा सोबत स्क्रिन शेअर करणार आहे . त्याच बरोबर राशी खन्ना देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Your email address will not be published.